Home महत्वाच्या बातम्या “राष्ट्रवादी पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…”

“राष्ट्रवादी पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेना  ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पोहरादेवीच्या दर्शनाने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

“जसे दिसते, तसे पक्षफुटीकडे पाहत आहे. पूर्वी पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवला जात आहे. पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत आहे. ‘ही परंपरा महाराष्ट्र आणि देशासाठी वाईट आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर आहोत,’ असं आम्हाला लोकांकडून सांगितलं जात आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का?; शालिनीताई पाटील यांचं सर्वात मोठं विधान, म्हणाल्या…

भाजपा काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिला नाही. दुसऱ्यांवर दोषारोप करण्याचं भाजपाने सोडून द्यावं. पहिलं आपल्या घरात बाजरबुणगे घुसून घेत आहेत, त्यांचा संभाळ करावा.”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

 राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवकचा पक्षाला राम

“महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या, खंडोजी खोपडेंचा नाही तर…; “