आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा विशेष शो आज ओअर परळ येथील पीव्हीआर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. चित्रपट बघितल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत चित्रपटाबाबत भावना व्यक्त केली.
काशिनाथ हे चांगला चित्रपट बनवतील याची मला खात्री होती. चित्रपट माध्यम मला समजतं. कळतं. आवडतं. हर हर चित्रपट पाहिल्यानंतर मी एकच सांगेन की, मेहनत काय असते. ते हे या चित्रपटात दिसते. खूप महिन्यांनी वर्षांनी उत्तम डायलॉग्स मला ऐकता आल्या. आनंद चित्रपट पाहताना भावनाविवश झालो होतो. सहसा माझ्या डोळात तसं पाणी येत नाही. पण, हर हर महादेव हा चित्रपट पाहताना असे काही प्रसंग होते की मी अभिजितला सांगत होतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. सर्वांनीच काय काम केली आहेत., असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : टीम इंडियाच्या दमदार ‘विराट’ विजयावर, पत्नी अनुष्का शर्माची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…
अभिजित, सुबोध भावे यांनी खूप चांगली काम केली आहे. मराठी चित्रपट खूप पुढं जातील, याच्या आशा पल्लवित होणं हा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. हर हर महादेव या चित्रपटाला राज ठाकरे यांनी व्हाईस दिला आहे. व्हाईस कसा झाला तो मला माहीत नाही. कसा झाला तो तुम्ही सांगावा, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
हरलेली मॅच पाकिस्तानच्या खिशातून विराटने खेचून आणली; वेलडन विराट
भाजप-शिंदे गटासोबत युती होणार का?; मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…
“मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”