नवी दिल्ली : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात नेहमी तुलना होत असते. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने सचिन आणि विराट यांच्यातील आपला आवडता खेळाडू कोण ते सांगितले.
सचिनने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. आता विराटदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नवनवे विक्रम करत आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यात सरस आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ए.बी.डिव्हीलियर्स याने व्यक्त केले.
सचिन आणि विराट यांच्यापैकी तुझी पसंती कोणाला असा प्रश्न माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर गंभीरने समर्पक उत्तर दिले. नक्कीच अशा वेळी मी सचिनची निवड करेन. सध्या नव्या नियमांमुळे फलंदाजी करणे खूप सोपं झालं आहे. पण जुन्या नियमनुसार पूर्ण ५० षटके एकच चेंडू आणि सीमारेषेवर पाच फिल्डर अशी परिस्थिती असतानादेखील उत्तम कामगिरी करणाऱ्या सचिनला माझी पसंती असेल.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्याशी चर्चा करायला लाज वाटते का?; शिवसेनेचा विरोधी पक्षाला सवाल
पुणेकरांना दिलासा…पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी!
सांगलीमध्ये आणखी तिघांना कोरोना…
एअरटेलचा नवीन प्लॅन लाँच; दिवसभरात वापरता येणार 50 GB डेटा