आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सहनशीलतेचा अंत झाला अन् एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर खडसे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी बोलताना, खडसेंबाबत 2 मोठे दावे केले आहेत.
मी आणि देवेंद्रजी बसलो होतो. तिथे खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू… त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे स्पष्टपणे कळू शकलं नाही. कारण आम्ही बसलो तिथे खूप गर्दी होती. तिथं त्यांना विचारता आलं नाही की नेमकं काय मिटवायचंय ते?, असा पहिला मोठा दावा महाजनांनी यावेळी केला.
हे ही वाचा : खासदार धैर्यशील मानेंना माजी खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही; शिवसेनेच्या नेत्याचा इशारा
एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते. ते अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर दीड तास बसून होते. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. शहा यांच्या कार्यालयातून मला फोन आला. त्यानंतर रक्षाताईंना मी फोन केला आणि विचारलं की काय झालं. त्यांनी सांगितलं की, आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण भेट होऊ शकली नाही, असंही महाजन म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून हॅलो नाही, वंदे मातरम् म्हणायचं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण
…तर दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार कोसळेल; एकनाथ खडसेंचा दावा
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश