आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर मंत्री संजय राठोड यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना मोठा धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी आज मातोश्रीवर येऊन थेट शिवसेनेत प्रवेश केला.
आज पोहरादेवी येथे बंजारा समाजाची पंचमीची यात्रा आहे. तिथे दोन लाख बंजारा आले आहेत. त्या मुहूर्तावर मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलो. मी मागेच म्हणालो होतो की, नवरात्रीत मोठा निर्णय घेणार. आजचा शुभ दिवस आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत संपूर्ण राज्यातून दीड ते दोन कोटी बंजारा भाविक, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सत्तेत वाटा देण्यासाठी शिवसेनाच योग्य आहे,असं सुनिल महाराज म्हणाले आहेत
दरम्यान, शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकते हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत. संपूर्ण बंजारा समाज त्यांना 2024 मध्ये उद्धव ठाकरेंना सत्तेत बसवणारच, असा निर्धारही सुनिल महाराज यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही”
पंकजाताईंचं राष्ट्रवादीत स्वागत…; ‘या’ मोठ्या नेत्याकडून पंकजा मुंडेंना थेट ऑफर