आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिंदे सरकार सत्तेत येऊन 3 महिने होत असूनही ‘गद्दार’ या एका शब्दावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मतभेद हे कायम आहेत. तसेच यात वाढ होत आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणुक लढली असताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुनच खरी गद्दारी केल्याचा आरोप राणेंनी यावेळी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक आहेत. त्यांनी पडत्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिल्यानेच शिवसेना उभी राहिल्याचे नारायण राणे म्हणाले.
हे ही वाचा : राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत; शिंदे गटात सामील होण्याची शक्यता
महाविकास आघाडीबरोबर जाऊनच उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली. त्यावेळी त्यांनी सर्व शिवसैनिकांना विचारात घेऊन निर्णय घेतला नाही तर स्वार्थासमोर त्यांना सर्वच बाबींचा विसर पडल्याचं राणे म्हणाले. त्यामुळे खरे गद्दार कोण हे आता जनतेचे समोर आल्याचेही राणे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे सरकारचा मोठा निर्णय; बारामतीचा ‘हा’ मोठा प्रकल्प आता जुन्नूरला हलवला”
शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; काँग्रेस आमदारांच्या कट्टर समर्थकासह कार्यकर्ते शिंदे गटात सामील
“बाळासाहेबांनी शिवसेनेची जवाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवताना राज ठाकरेंनाही बाजूला केलं होतं”