Home महाराष्ट्र वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं नेमकं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलिण्यात येणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वेदांता प्रकल्पाबाबत माहिती घेतली तेव्हा खूप उशिर झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेच वेळकाढूपणा केल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केला. तसंच तो महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वकश प्रयत्न केले पण उशिर झाला होता, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितला, शिवसैनिक आणि गद्दारीतला फरक, म्हणाले…

गुजरात हे देखील देशातीलच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही, असंही फडणवीस म्हणाले. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता पक्षाला राम राम ठोकण्याच्या तयारीत; शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

“शिंदे सरकारचा मोठा निर्णय; बारामतीचा ‘हा’ मोठा प्रकल्प आता जुन्नूरला हलवला”

शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; काँग्रेस आमदारांच्या कट्टर समर्थकासह कार्यकर्ते शिंदे गटात सामील