आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर अनेकांचा शिंदे गटात जाण्याचा कल वाढला. अशातच राष्ट्रवादी-काँग्रेसचे नवी मुंबईतील जवळपास अर्धा डझन नगरसेवक पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.
तसेच येत्या काही दिवसात आणखी नगरसेवक व पक्ष संघटनेतील पदाधिकारी राष्ट्रवादीला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! भ्रष्टाचार प्रकरणात भाजपचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या रडारवर
दरम्यान, नवी मुंबईत राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. मात्र, नवी मुंबईतील मोठे नेते गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. यातूनही नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीला आणखी मोठा धक्का बसणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले, पण…
शिंदे गट-मनसे युती होणार?; राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…