आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊतांनीच सांगितलंय, मी काही केलं नाही. मग कर नाही त्याला डर कशाला? चौकशी होऊ द्या. त्यातून सत्य पुढे येईलच, असं शिंदे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंचं काम जनता कधीच विसरणार नाही, बंडखोरांना याची किंमत मोजावी लागेल”
दरम्यान, संजय राऊत यांची चौकशी चालू आहे ना. चालू द्या. त्यांना अटक होणार की नाही मला माहीत नाही. मी काही अधिकारी नाही. ईडीची चौकशी सुरू आहे. चौकशी होऊ द्या., असंही शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजप इंग्रजांचं धोरण राबवतेय; नाना पटोलें संतापले
शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान
संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता; संजय शिरसाट यांचं मोठं विधान