“हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा एक असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं”

0
520

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गुरू माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चाही झाली. या भेटीनंतर गुरू माँ यांनी माध्यमांशी संवाद साधत मनसे-भाजप युतीवर मोठं विधान केलं.

हे ही वाचा : …त्यामुळे संजय राऊतांना कमी-जास्त प्रतीचा गांजा कसा असतो ते चांगलं कळतं; नितेश राणेंची टीका

जर मनसे आणि भाजपची हिंदुत्त्वाबद्दल विचारधारा जुळत असेल तर राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं, असं मत गुरू माँ यांनी यावेली व्यक्त केलं.

राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांवर प्रेमच आहे. लोकांनी त्यांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला, असं गुरू माँ यांनी म्हटलं. मुंबईसह महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदू विरोधी पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेसमोर भाजप- आणि मनसे हाच एकमेव पर्याय आहे, असा दावा गुरू माँ यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का; सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश

“देशाला राज ठाकरेंसारख्या नेत्याची गरज, ते जे बोलतात ते करतात”

शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here