Home नांदेड शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा...

शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपमध्ये येण्याच्या तयारीत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. देगलूर यथे होता असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : हिंदुराष्ट्र मजबूत करण्याचा राज ठाकरेंनी केला निर्धार; राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार

“हे सरकार 100 पैकी 100 टक्के नापास आहे. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते वारंवार करतात. मात्र शिवसेनेत मोठी खदखद आहे. सेनेचे 12 आमदार नाराज आहेत. त्याची काही उदाहरणे द्यायची म्हटली तर सुभाष साबणे, प्रताप सरनाईक अशी देता येतील, असं बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.

नाराज सेना आमदारांना न्याय मिळत नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकासासाठी निधी मिळत नाही आणि विकास होत नाही. खूप लोकांना खूप काही बोलायचं आहे. पण त्यांना बोलता येत नाही. असेच सेनेचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात आहे. सरकारच्या पापाच्या घडा भरलाय. लवकरच तो फुटणार आहे, असा दावाही बबनराव लोणीकर यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

विदर्भातही मनसेचा जोर वाढला; अनेकांचा मनसेत प्रवेश

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोमणा

“ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ, गडचिरोलीतील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”