आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सावंतवाडी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केलं आहे. नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच; डॅशिंग नेते वसंत मोरेंचं शिंदे सरकारला आवाहन
शिवसेनेवर आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हेच एकमेव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व नाहीसे झाले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आता आता बोलण्यापेक्षा गप्प करावे. मुख्यमंत्री असतानासुद्धा स्वतःचे आमदार सांभाळता आले नाहीत, ते मतदार काय सांभाळणार?, असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची नाराजी; अनेकांनी सोडली शिवसेनेची साथ, केला मनसेत प्रवेश
राज ठाकरे हे हिंदूजननायक! त्यांची आणि बाळासाहेबांची भूमिका एकच
फडणवीसांना घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं; विनायक राऊतांचा खोचक टोला