आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा : “मोठी बातमी! अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा”
मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ! , असं भावनिक ट्विट संजय राऊतांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री अत्यंत gracefully
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ! pic.twitter.com/smK6e3GKHa— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; मनसेचं एकमेव मत भाजपाच्या पारड्यात
भाजपमध्ये हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल