Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच आगे आगे देखो होता है क्या, असंही गडकरींनी यावेळी म्हटलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गडकरींनी झी परिषदेच्या व्यासपीठावरून संवाद साधता याबाबत भाष्य केलं.

हे ही  वाचा : बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेणार का?; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

मला वाटतं की, महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता है क्या. आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल., असं गडकरी म्हणाले.

वैयक्तिक संबंध हे राजकारणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असतं. तसंच सरकारे येतात आणि जातात, पंतप्रधान येत राहतात, पण हा देश राहिला पाहिजे. देशासाठी काम केलं पाहिजे, असंही गडकरींनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

आमदारांच्या बंडामागे खरंच मुख्यमंत्र्यांचा हात?; स्वत: उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“आम्ही शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही; शिंदे गटातील ‘या’ महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल”

“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”;शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य