नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडेंचा समावेश होणार का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

0
425

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवं सरकार स्थापन झालंय, मात्र अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार का नाही, अशा चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत.

हे ही वाचा : “शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सूरूच; स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसह पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनाच प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांनी त्यावर बोलणं टाळलं. तसंच त्यांनी दुसऱ्या पत्रकाराला तुमचा प्रश्न काय असं विचारलं.

दरम्यान या विषयावर मी काहीही बोलू शकणार नाही. या विषयावर निर्णय घेणारी यंत्रणा मोठी, सर्वोच्च आहे. ते बोलतील तेव्हा मंत्रीमंडळाचा विषय मार्गी लागेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राणेंची मुलं लहान, त्यांना समज देण्याचं काम फडणवीस करतील- दीपक केसरकर

धनुष्यबाण कुणाला द्यावं, शिंदे गटाला की उद्धव ठाकरेंना?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

रोहित शर्माच्या षटकारामुळे स्टेडियममधील चिमुकली जखमी; व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here