Home महाराष्ट्र धनुष्यबाण कुणाला द्यावं, शिंदे गटाला की उद्धव ठाकरेंना?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर,...

धनुष्यबाण कुणाला द्यावं, शिंदे गटाला की उद्धव ठाकरेंना?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.  आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

त्यानंतर आता शिवसेनेत 2 गट झाले आहेत. एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा उद्धव ठाकरे यांचा. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कुणाचं ?, हा सवाल आता उपस्थित होत आहे. यावरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : रोहित शर्माच्या षटकारामुळे स्टेडियममधील चिमुकली जखमी; व्हिडिओ व्हायरल

एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना द्यावं आणि राहिलेलं त्यांनी घ्यावं , असा सल्ला रामदास आठवलेंनी यावेळी दिला. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंनी आज बाळासाहेबांसारखा निर्णय घेतला; शिंदे गटातील आमदाराकडून काैतुक

बीड पालिकेतील सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकणार; राष्ट्रवादीच्या आमदारांचा निर्धार

भाजप नेत्याने महिलेला फसवलं, हॉटेलमधील व्हिडीओ आला समोर