आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली आहे.
हे ही वाचा : ‘….म्हणून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो’; राजू शेट्टींचा खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर आपण हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी गुरुवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी शुक्रवारी ते मुंबईत दाखल देखील झाले होते. पण राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याने मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरी जाऊन नोटीस बजावली होती. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला इरादा बोलून दाखवला आहे.
दरम्यान, उद्या कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
“राष्ट्रवादीची मोठी खेळी; एमआयएम, भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”