Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या मागे भाजपचा हात आहे, असं वाटतं का?; अजित पवारांनी दिलं...

एकनाथ शिंदेच्या मागे भाजपचा हात आहे, असं वाटतं का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. या बंडामागे भाजप असल्याचे आरोप शिवसेनेकडून केले जात आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी या बंडामागे भाजपा आहे का? यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलंय.

हे ही  वाचा : बरं झालं, मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भिती गेली आणि ते बाहेर पडले; मनसेचा खोचक टोला

पत्राकारांशी बोलताना अजित पवारांना या बंडामागे भाजपा आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “अजून तरी तसं काही दिसलं नाही,” असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं. आताच्या घडीला कुठलाही भाजपाचा नेता किंवा मोठा चेहरा तिथं येऊन काही करतोय असं दिसत नाही,” असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमचा पाठिंबा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. हे सरकार टीकवण्याचीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहील, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी?; दिपाली सय्यद यांचा सवाल

शिंदे बरोबर गेलेल्या 18 आमदारांनी आमच्या सोबत संपर्क केला; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात जे सत्तेचे महाभारत होत आहे, ते भाजपाचे षडयंत्र”