आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर सदावर्तेंना न्यायालयाने सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली.
आज सदावर्तेंना गिरगाव कोर्टात हजर केलं आहे. या सुनावणीवेळी सदावर्तेंनी न्यायालयात आपली बाजू मांडली. यावेळी युक्तीवाद करत असताना सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य केलं आहे. तसेच आज झालेल्या युक्तीवादानंतर गिरगाव कोर्टाने पुन्हा एकदा सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंना खाज ठाकरे बोलणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
दरम्यान, आज कोर्टात युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी म्हटलं, सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी,नाहीतर…”; ‘या’ आमदाराचा राज ठाकरेंना इशारा
‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला करणार…
राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका