आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातचं माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर टीका करतानाच थेट त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच राज यांना आवर घालण्याची विनंती केलीय.
हे ही वाचा : ‘मनसे’ची आणखी एक घोषणा; अक्षय्य तृतीयेला करणार…
राज ठाकरेंचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणार असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करतानाच माने यांनी, “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” असं आवाहन केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला नाही तर प्रसंगी मी स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असं इशाराही लक्ष्मण मानेंनी दिलाय. साताऱ्यामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका
“कोल्हापूरातील विजयानंतर जयश्री जाधव पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण”
भोंग्यांबद्दल सरकारला अल्टीमेटम देणाऱ्या राज ठाकरेंची औकात काय?; ‘या’ माजी आमदाराचा हल्लाबोल