आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईतील कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रजनी कुडाळकर असं त्यांचं नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केल्याचं कळताच मुंबई पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रजनी कुडाळकर यांचा मृतदेह पोलिसांनी राजावाडी पोलिस स्थानकात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
हे ही वाचा : संजय राऊत सध्या नैराश्येत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस
मंगेश कुडाळकर मुंबईतील कुर्ला विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. कुर्ल्याच्या नेहरु नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. येथीलच राहत्या घरी रजनी यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं.
महत्वाच्या घडामोडी –
आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
‘नवहिंदू ओवैसी म्हणणाऱ्या संजय राऊतांना, राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…