Home पुणे मनसेला भाजपसोबत घेणार का?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मनसेला भाजपसोबत घेणार का?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यात झालेल्या उत्तरसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. त्यानंतर भाजपचे काही नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटून गेले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप-मनसे युती होणार का? अशी चर्चा सूरु झाली. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेला भाजपसोबत घेण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करण्यासाठी भाजपाची 13 जणांची कोर कमिटी आहे. ते देखील यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. फार फार तर केंद्राकडे प्रपोजल पाठवू शकतात. त्यामुळे आता अशी कुठलीही शक्यता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा : शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी; मनसेची आक्रमक मागणी

महाविकास आघाडी आणि पवार साहेबांचं असं आहे, त्यांना बरं म्हटलं तरच बरं, कोर्टाने त्यांना न्याय दिला तर न्याय आणि कोर्टाने किरीट सोमय्या यांना न्याय दिला की काहीतरी गडबड हे काही बरोबर नाही. राज साहेब ठाकरे हे त्यांची मतं अतिशय परखडपणे मांडत असतात”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत

दरम्यान, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्या ठाकरे सरकारमधील आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच; रिचेबल झाल्यानंतर सोमय्या उद्या बाॅम्ब फोडणार?”

“मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून ‘या’ नाराज नेत्याने दिला राजीनामा”

“देवेंद्र फडणवीसजी आयुष्यभर हेच करणार आहात का?”; राष्ट्रवादीचा सवाल