आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आता सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा : “राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत, वारसदार नाहीत”
एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखील वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आक्रमकपणे आंदोलन केल्याप्रकरणी 110 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात आज सरकारी वकिलांसह सदावर्ते यांचे वकील तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, यावेळी सरकारची बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल झालेले कलम गंभीर असून त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर त्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी बदलून लिहिल्याचा आरोप केला आहे, तसंच सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीसही देण्यात आली नाही, असा दावा केला.
महत्वाच्या घडामोडी –
“एकनाथ खडसे-किरीट सोमय्या एकाच मंचावर एकत्रित, घेतली गळाभेट; चर्चांना उधाण”
पवार साहेबांमुळेच मी आमदार झाले, अन्यथा होऊ शकली नसते; नवनीत राणांची पवारांच्या समोरच कबुली
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपलं हिंदुत्व सोडून दिलं; मनसेची टीका