Home महाराष्ट्र “राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत, वारसदार नाहीत”

“राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत, वारसदार नाहीत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनीही भाष्य केलं आहे.

कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “एकनाथ खडसे-किरीट सोमय्या एकाच मंचावर एकत्रित, घेतली गळाभेट; चर्चांना उधाण”

राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे. असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पवार साहेबांमुळेच मी आमदार झाले, अन्यथा होऊ शकली नसते; नवनीत राणांची पवारांच्या समोरच कबुली

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपलं हिंदुत्व सोडून दिलं; मनसेची टीका

मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं- चंद्रकांत पाटील