आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या साडेचार महिन्यापासून सूरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत आज कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. तसेच जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असे महत्वाचा निकाल कोर्टाने दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शन द्यावी असंही कोर्टाने म्हटलं आहे. या निर्णयावर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “पुणे अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काहीही झालं तरी…”
गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच सदावर्तेंनी यावेळी भाजप नेत्यांचं काैतुक केलं आहे. कष्टकरी उपाशी मरत होते 5 महिने. उद्धव ठाकरे सरकारने ज्यांना विचारलं नाही, ज्यांनी भुकेला अन्न दिलं, राजकारण नाव असं समजू नये, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नवनीत राणा, धोंडे, अनुराधा पौडवाल यांनी 5 महिने अन्न दिलं, त्यांचं खरोखर मी कौतुक करतो. त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानणार नाही, कारण पोटाची भूक त्यांनी भागवलेली आहे, असं सदावर्ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार, अजित पवार यांच्यामुळे 138 मृत्यू झाले, त्यांच्यावर जातीच्या राजकारणाचे आरोप झाले, आज त्यांचा क्लिन बोल्ड केला, आज न्यायालयाने आरसा दाखवला, त्यांचं तोंड पाहण्यासाठी, ते आज गलिच्छ राजकारणी ठरलेले आहेत, असा हल्लाबोलही सदावर्तेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईत येताच संजय राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…
वसंत मोरेंची राजकीय हत्या का केली?; रुपाली पाटलांची प्रतिक्रिया
किरीट सोमय्या मला घाबरतो, त्यामुळे…; शिवसेना नेत्याची जीभ घसरली