Home महाराष्ट्र छत्रपतींना जेंव्हा सन्मान देण्याची वेळ येते, तेंव्हा शिवसेनेनं…; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

छत्रपतींना जेंव्हा सन्मान देण्याची वेळ येते, तेंव्हा शिवसेनेनं…; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचा कार्यकाळ संपला. यानंतर शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातीलच संजय पवार यांच्या नावावर शिवसेनेनं शिक्कामोर्तब केलं आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

जेंव्हा जेंव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेनं त्यांचा अपमान केला, असा आरोप शेलार यांनी यावेळी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : ज्ञानवापी मशीद प्रकरणी शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, मंदिर जेवढं जुनं त्याचप्रमाणे….

एका गोष्टीचा खेद वाटतो ज्यावेळी आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या त्यावेळी शिवसेनेने त्यांचा अपमान किंवा अनादरच केला आहे. त्याचे कारण मला माहिती नाही. छत्रपतींच्या घराण्याचा जेवढा अनादर, अपमान शिवसेनेने केला तेवढा कोणीच केला नाही. म्हणून आपण बघितले असेल कधी विश्वविख्यात प्रवक्ते छत्रपतींच्या वंशजांच्या घराण्याचे पुरावे मागतात, असंही शेलार यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेनं शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केल्यानंतर, आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही, तर…; रावसाहेब दानवेंची टीका

“कुुछ फोटो अच्छे भी होते है, म्हणत मनसेकडून पवार कुटूंब व भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर, चर्चांना उधाण”