आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. यावरून आता शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. ते आमच्या जिल्ह्यात यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात, असा टोला गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : “आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
राज ठाकरे यांच्या हातात काहीच लागत नाही म्हणून त्यांनी हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. मोदींवर टीका केली, बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. त्यांचा हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“कोकणात शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ निष्ठावान कार्यकर्त्यानं हाती बांधलं शिवबंधन”
मनसे ही बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंबूडही; शिवसेनेचा जोरदार पलटवार