आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : राज ठकारे स्वत:चे विचार मांडत असतात. आम्हाला कुणाची ए किंवा बी टीम व्हायचे नाही. शिवसेना राष्ट्रवादीची ढ टीम आहे. आम्ही तसे नाही. आमचे विचार हे आमचे विचार आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत, अशी टीका मनसेने शिवसेनेवर केली होती. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : पाण्याच्या समस्येमुळे पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचं हंडा मोर्चा आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात
कोण कुणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या कोणत्या वाफा दवडायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मेरिटमध्ये आली आहे. म्हणूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. राज्याचं नेतृत्व शिवसेना करते याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं, शिवसेनेत निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि शिवसेनेला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षा खाली मानावा लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसेवर पलटवार केला.
दरम्यान, महाराष्ट्राच्या, देशाच्या दृष्टीने शिवसेना आणि मुख्यमंत्री मेरिट लिस्टमध्ये आले आहेत. आता कुणाला काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“ज्यांना भूमिका ठरविता येत नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं?; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण”
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”