आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लासलगाव : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, असं म्हणत शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेना-भाजपची आठवण उगाळली.
आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली असली तरी शिवसेनेनेही युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे. तसेच शिवसेना पैलवान आहे आणि आम्हीही पैलवान आहोत. मुंबईचे घोडामैदान दूर नाही, असा इशाराही गुलाबराव पाटलांनी यावेळी दिला. ते लासलगाव येथे बोलत होते.
हे ही वाचा : Budget 2022 : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल”
दरम्यान, शिवसेना आणि मुंबईचे नाते 1966 पासून आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते, तर काय झाले असते, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे. हे पाच वर्ष सोडले, तर पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, अशी आठवण गुलाबराव पाटलांनी यावेळी करून दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”
उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं म्हणजे…; जयंत पाटलांची भाजपावर टीका
मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; पालकमंत्र्यांना दिला इशारा