आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशात भाजपाला दमदार यश मिळालं, यानंतर राज्यातील भाजपा नेते ठाकरे सरकारवर निशाना साधत आहेत. अशातच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांकडून भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा दिल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपाकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असं बोललं जात असल्यासंबंधी विचारलं असता “ठीक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : आता पहा, 11 तारखेला काय होतं ते; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
“पंजाबमध्ये हा जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, मात्र हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे. पंजाब असं एक राज्य होतं ज्याठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळं चित्र बघायला मिळत आहे,” असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
आप हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्या पद्धतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ला झाला असं दिसते,” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”
जबतक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…; चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचलं
शिवसेना जिथे जिथे जाते, तिथे डिपॉझिट जप्त होते; रावसाहेब दानवेंची टीका