आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र परवा त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. अशातच आता भाजपने ठिकठिकाणी मोर्चे काढले आहेत.
विरोधकाचे मोर्चे आझाद मैदानापासून काही अंतरावर मेट्रो सिनेमाजवळ अडवण्यात आले आहेत. शेकडोच्या संख्येने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र विरोधकांनी हा मोर्चा मागे घेण्याच नकार दिला.
हे ही वाचा : ते संजय राऊत किती बोलतात, कॅमेरा लागला की हे सूरू, आणि बंद झाल्यावर…; राज ठाकरेंचा खोचक टोला
दरम्यान, मोर्चाचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसांच्या गाडीत कोंबून नेण्यात आलं. तसेच फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
महत्वाच्या घडामोडी –
‘…कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका’; रामदास आठवलेंची खास शैलीत टीका
आमच्याच महापुरूषांना बदनाम करायचं आणि…; राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार
भाजपला धक्के सुरूच; या ‘दोन’ नगरसेवकांनी दिले राजीनामे; राष्ट्रवादीत प्रवेश करणार?