आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीच्या) सूरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं दिल्लीचं आक्रमण आहे. पण महाराष्ट्र अशा कारवायांसमोर झुकणार नाही, थांबणार नाही, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : आता मनसेकडूनही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी; कोकण भवन कार्यालयासोमर काढला भव्य मोर्चा
आज आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा मारला. या विषयावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली.
‘ महाराष्ट्रावर आधीही आक्रमण झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमण आहे. जेंव्हापासून इथे निवडणूक लागेल आणि महाविकास आघाडीची भीती वाटू लागलीय, तेव्हापासून हे सुरु आहे. हे यूपी, हैदराबाद, बंगालमध्ये केलेलं. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. पण यांच्यापुढे महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा पलटवार आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
‘…तर तुमचे वांदे होतील’; निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना टोला
तृतीयपंथी सपना आणि बाळू अखेर अडकले विवाह बंधनात!
मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेना महिला नेत्याचा मनसेत प्रवेश