‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’; वंचित बहुजन आघाडीचं राज ठाकरेंना थेट आव्हान

0
519

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील. अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेश मनसैनिकांना दिलाय. आता यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय.

हे ही वाचा :  ‘…म्हणून पूनम पांडेने ओलांडल्या सर्व मर्यादा’; कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस

मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला?, असा सवाल सुजात आंबेडकर यांनी यावेळी केला.

दरम्यान,  महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा. मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ED ने थेट…”;मनसेचा संजय राऊतांना टोला

रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं समज; रोहित पाटलांनी केला गडकरींच्या भेटीचा किस्सा शेअर

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनंं पुन्हा डिवचलं; शिवसेना भवनसमोर केली बॅनरबाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here