आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठी भाषादिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांंनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर एक नवी जबाबदारी सोपविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रिय होताना दिसत आहेत. अशातच आता अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर मनविसेच्या अक्षरशः हजारो पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आज ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी येऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
हे ही वाचा : “सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”
सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत शिस्तबद्ध रांग लावून असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी श्री. अमितजी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसैनिकांनी अमित ठाकरेंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक व्यक्त करत होता.
महत्वाच्या घडामोडी –
मी, मनसेच्या सगळ्या शाखांंना अन् मंत्र्यांना शिवरायांच्या संदेशाची पाटी पाठवणार- राज ठाकरे
“युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी आता शरद पवार उतरले मैदानात; दिल्या ‘या’ सूचना”
“मोठी बातमी! युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू”