Home देश लाज वाटते, आमच्यातील काही लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

लाज वाटते, आमच्यातील काही लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशातील जनता विद्यमान सरकारच्या नेतृत्वावर समाधानी नसून येथे केवळ दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे. त्यामुळे या राज्यात परिवर्तनाची लाट येणे आवश्यक असून शिवसेनेचे उमेदवार हेच परिवर्तनाचं प्रतीक आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : “काँग्रेसचा मोठा डाव, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये केली घरवापसी”

दरम्यान, चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तेंव्हा या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं, आमच्यातीलच काही लोकांनी शेतकऱ्यांना असं म्हटल्याबद्दल आम्हाला अजूनही खंत वाटते, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचीही हीच स्थिती झाली असून आता यात बदल आवश्यक असल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

जळगावातील शिवसेना-भाजप युतीवरून खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

“सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

“खासदार सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित, सलग 7 वर्षे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी”