“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण”

0
389

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र बैठक संपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे बैठक संपल्यानंतरच्या या प्रकारामुळे चर्चांना उधाण आलंय.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षाच्या नेत्यांना निमंत्रित केलं होतं. मात्र ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काही काळ भेट झाल्याचं कळतंय.

दरम्यान, बंद दरवाज्याआड ही बैठक झाल्याची माहिती असल्याने राजकीय क्षेत्रात या बैठकीची जोरदार चर्चा सुरू असल्याचं समोर येतंय.

महत्वाच्या घडामोडी –

तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण हे सरकार देश विकण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी

“राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट नाकारली?; चर्चांना उधाण”

“राज्यात पुन्हा संचारबंदी लागणार?; केंद्राने दिल्या राज्याला स्पष्ट सूचना”

भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर, काही नेते माझ्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here