Home देश तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण हे सरकार देश विकण्यात व्यस्त आहे- राहुल...

तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण हे सरकार देश विकण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली : राज्यात कोरोनानं थैमान घातलेलं असतानाच, वाढत्या महागाईमुळं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडत चाललं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

देशात कोरोनाची परीस्थिती असताना केंद्र सरकार विमुद्रीकरणात व्यस्त आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी याबाबत ट्विट केलं आहे.

तुमचं भविष्य विकलं जात आहे. तीन चार लोकांना देशाची संपत्ती भेट म्हणुन दिली. आधी इमान विकला अन् आता देश विकण्याच्या तयारीत आहेत. देशात कोरोनाची संख्या वाढत असताना कोरोना लसीकरणाची गती मंद होत आहे. येणाऱ्या संभाव्य लाटेत गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, कारण केंद्र सरकार देशाची मालमत्ता विकण्यात व्यस्त आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट नाकारली?; चर्चांना उधाण”

“राज्यात पुन्हा संचारबंदी लागणार?; केंद्राने दिल्या राज्याला स्पष्ट सूचना”

भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर, काही नेते माझ्या संपर्कात; नाना पटोलेंचा दावा

नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…