आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित असले तरी रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात आपापसात मतभेद सुरु आहेत.
माणगाव नगर पंचायतीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याची दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून भविष्यात जिल्हयातील राजकारणात शिवसेने सोबत दोन हात करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तालुका अध्यक्षांना चारचाकीचं वाटप; अजितदादांच्या हस्ते केलं वाटप
सत्तेसाठी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची मद्त घेतली आणि शिवसेनेने लाजीरवानी गोष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अश्लाघ्य भाषेत टिका करणाऱ्या भाजपाशी संगनमत केले, अशा शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये, अशी टीका सुनिल तटकरे यांनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान, बुधवारी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसनं निलंबित केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”