Home जळगाव राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन...

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर; गिरीश महाजनांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राज्यात वीजबिलांवरून चर्चांना उधाण आलं आहे. महावितरण मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे वीजबिलं भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच ज्यांची बिलं थकली आहेत त्यांची वीज कनेक्शन कापण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं ऐन हंगामात मोठं नुकसान होत आहे. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महावितरणावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बोलताना महाजनांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर, असा टोला गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

हे ही वाचा : “हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”; सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर टीका

राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नसून उलट कॅबिनेटमध्ये या सरकारची आपापसात मारामारी सुरू आहे. एक आंधळा एक बहिरा व एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर हे सरकार असल्याची टीका महाजनांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा जामीन नाकारला; राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांना पुन्हा कोरोनाची लागण”

“औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच, कुणीही विरोध करू नये”