भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत; नवाब मलिकांचा मोठा गाैफ्यस्फोट

0
429

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज बोलताना मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

येत्या काळात भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत. काही सीटिंग आमदार भाजप सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. तुमचा पक्ष फुटणार नाही याकडे लक्ष द्या, असा मोठा गाैफ्यस्फोट नवाब मलिक यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : ‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-आस्मानाचा फरक, मात्र काहींनी…’, अजित पवारांचा भाजपाला टोला

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत शिवसेना व काँग्रेसचे अनेक नेते पळवले. राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना खाल्ल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याला उत्तर देताना नवाब मलिकांनी हा गाैफ्यस्फोट केला. तसेच भाजपचे अनेक नेते पक्ष सोडणार आहेत, या भीतीपोटी चंद्रकांत पाटील आमच्या मित्रपक्षांबाबत असं विधान करत असावेत. मात्र हे नक्कीच की, भाजप निश्चित रूपात महाराष्ट्रात फुटणार आहे, असं नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकार मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र…; चंद्रकांत पाटलांची टीका

महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; ‘या’ दिवशी होणार मनसेची बैठक

किराणा दुकानात आला दारूचा माल…; रामदास आठवलेंनी काव्यमय शब्दात उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here