Home पुणे ‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-आस्मानाचा फरक, मात्र काहींनी…’, अजित पवारांचा भाजपाला टोला

‘वाईन आणि दारूमध्ये जमीन-आस्मानाचा फरक, मात्र काहींनी…’, अजित पवारांचा भाजपाला टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राज्यातील सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वाईन विक्री निर्णयाच्या मुद्द्यावरून विरोधकांना कानपिचक्या दिल्या आहेत.

वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ठाकरे सरकार मद्यविक्रीचा व्यवसाय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र…; चंद्रकांत पाटलांची टीका

आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पुण्यात करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; ‘या’ दिवशी होणार मनसेची बैठक

किराणा दुकानात आला दारूचा माल…; रामदास आठवलेंनी काव्यमय शब्दात उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

मोदी सरकारने देशद्रोह केला; पेगासस साॅप्टवेअर खुलासा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल