Home महत्वाच्या बातम्या भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण; मतदानाच्या वादावादीतून झालंं भांडण

भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण; मतदानाच्या वादावादीतून झालंं भांडण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

साक्री नगरपंचायत मतदानादरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. मतदानाच्या वादावादीतून झालेल्या भांडण टोकाला गेलं. यांनंतर जोरदार मारहाण झाली. शैलेश आजगे असं मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

हे ही वाचा : राणेंना रातोरात अटक करणार पोलिस आता का गप्प आहेत; नाना पटोले प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

भाजपचे जिल्हा सरचिटणीस असलेल्या पदाधिकाऱ्याला विरोधकांनी बेदम चोप दिला. या मारहाणीत त्याचे कपडेही फाडण्यात आले. शिवाय त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांनी आणि गुंडांनी मिळून माझ्यावर हल्ला केला, असा आरोप शैलेश आजगे यांनी केलाय. तसंच पोलिसांनीही बघ्याचीही भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय.

महत्वाच्या घडामोडी – 

औरंगाबादेत संत एकनाथ रंगमदिराचे खासगीकरण थांबवा, अन्यथा…; मनसेचा इशारा

देशातील एकमेव प्लग अँड प्ले औद्योगिक प्रकल्प म्हणून भूमी वर्ल्ड प्रसिद्ध

“शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल”; भाजप नेत्याचा इशारा