आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! , असा टोला फडणवीसांनी लगावला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”
शरद पवारांवर बोलणार्या फडणवीसांना यापूर्वी पवारांनी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मलिक यांनी यावेळी लगावला.
शरद पवार मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात 25-30 जागा निवडून येत होत्या ते पवारसाहेबांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारसाहेबांवर फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले याची आठवणही मलिक यांनी यावेळी करून दिली.
महत्वाच्या घडामोडी –
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ‘या’ 5 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलत आहे; चद्रंशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल
“पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही, फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल”