Home पुणे “पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही, फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल”

“पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही, फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं! , असा टोला फडणवीसांनी लगावला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण प्रभावाने सक्रिय आहेत. त्यांनी या काळात राजकीय आणि सामजिक अवकाश व्यापून टाकला आहे. मात्र, 20 वर्षांच्या, त्यातही निम्मा काळ नागपूर शहरातील एका मतदारसंघापुरते सक्रिय असणाऱ्या फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका करणे अगदीच हास्यास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदावर बसावे लागलं आहे. त्याचीच मळमळ त्यांच्या मनातून अशा पद्धतीने बाहेर पडत आहे, हे जाणवत आहे, असा टोला जगताप यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, सरकार चालवताना पवार साहेबांचा सल्ला आणि निवडणूक प्रचारात त्यांच्यावर टीका असेच धोरण भाजपने ठेवलं आहे. फडवणीसांनी मात्र त्यांच्या नेतृत्वाकडून फक्त टीका करण्याचा आदर्श घेतला आहे. तसेच पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल, असंही जगताप यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, तर त्यांच्या आदर्शावर चला”

‘…यामुळे किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’; किरण माने प्रकरणवर मनसेची प्रतिक्रिया