Home महाराष्ट्र महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महिलांसोबत गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली, त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आणी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आलं. किरण माने यांना मालिकेतून काढल्यापासून अनेक वाद-विवाद पहायला मिळत आहे.

आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्यानं आपल्याला मालिकेतून काढण्यात आलं, असं किरण माने यांनी म्हटलं. यावरून स्टार प्रवाह वाहिनीनं परिपत्रक जाहीर करत किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा : “छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे, तर त्यांच्या आदर्शावर चला”

किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः मालिकेतील महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, असं स्टार प्रवाहनं या परिपत्रकात म्हटलं. यावरून आता किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा. मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच, असं स्पष्टीकरण किरण माने यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

‘…यामुळे किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’; किरण माने प्रकरणवर मनसेची प्रतिक्रिया

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी नाकरली; नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी