आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या कालच्या बैठकीत एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात, असा निर्णय राज्य सरकारनं काल पार पडलेल्या बैठकीत घेतला. या निर्णयावरून भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
हे ही वाचा : मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांना झटका?; मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व
राजसाहेबांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांचे बंधू उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असल्यावर हा निर्णय घेण्यात आला याचा आणखी आनंद आम्हा सर्वांना झाला आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक स्वप्न पूर्ण झालं याचाही तितकाच आनंद आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. तसेच मराठी पाट्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयाचे खरे श्रेय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि मनसैनिकांचं आहे. यावरून राजसाहेबांनी याबाबतीत केलेले आंदोलन ही त्यांची दूरदृष्टी होती, हे मान्य केलंच पाहिजे, त्यामुळे आता सगळ्याच दुकानांच्या पाट्या मराठीत दिसतील, असा दावा तृप्ती देसाईंनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
मराठी पाट्यांचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या मनसैनिकांचं आहे- राज ठाकरे
“विदर्भात मनसेला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह मनसेचे 40 पदाधिकारी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार”
संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं; देवेंद्र फडणवीसांचा टोला