Home महाराष्ट्र अपक्षांच्या पाठिंब्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

अपक्षांच्या पाठिंब्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचं स्पष्ट बहुमत झालं आहे. त्यामुळे रामदास कदम गटाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धोबीपछाड दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मंडणगड व दापोली नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात रामदास कदम-आमदार योगेश कदम या पिता-पुत्रांचा गट, अशी थेट लढत झाली. शिवसेनेच्या बंडखोरांनी या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी ‘शिवसेवा शहर विकास आघाडी’ स्थापन करत महाविकास आघाडीला जोरदार टक्कर दिली.

हे ही वाचा : भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले?; नथुराम गोडसे भूमिकेवरुन कोल्हेंवर टीका करणाऱ्या नेत्यांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

दापोली नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, पण मंडणगडमध्ये यश आले नाही. येथे राष्ट्रवादीचे 7 तर शिवसेवा शहर विकास आघाडीचे 7, तर 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले. यामुळे सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या.

दरमयान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी 2 अपक्ष नगरसेवकां सोबत घेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात या 9 सदस्यांसह येऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्र दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत

Why I Killed Gandhi : नथुराम गोडसे भूमिकेवर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..“अफझल खानाचीही…”

गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा