Home महाराष्ट्र आपल्याला रोजी-रोटी बंद करायची नाही पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

आपल्याला रोजी-रोटी बंद करायची नाही पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली असून राज्यात सकाळी जमावबंदी, तर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलं आहे.

हे ही वाचा : व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये आता दिसणार…; जाणून घ्या नव्या फिचरबद्दल

कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला 2 वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाच्या 2 मोठ्या लाटा अनुभवल्या. तसेच काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. त्यामुळे तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

आपल्याला काम बंद करायचं नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवनामान थांबवायचं नाही. मात्र काही निर्बंध पाळून राज्याला या कोरोनापासून मुक्त करायचंय”,, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, घाबरु नका, काळजी घ्या; महापौर किशोरी पेडणेकर यांचं जनतेला आवाहन

“आशिष शेलार यांच्यानंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी”

किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…