आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने बाजी मारली, तर एका जागेवर भाजपने विजय मिळवला.
हे ही वाचा : ‘शिवतीर्थ’ वरील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; राज ठाकरेंकडून आगामी 10 दिवसांचे कार्यक्रम रद्द”
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव केला आहे. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला अपयश आलं आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार प्रदीप कंद यांना बारामतीतून 52 मतं मिळाली आहेत, त्यामुळे “साथ कोणी दिली? बारामती” अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचं धनुष्य आता आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
‘या’ मराठी चित्रपटात राज ठाकरे यांनी साकारलीये मुख्य भूमिका, तुम्ही बघितलंत कधी त्यांचं हे रूप?
“पंकजा मुंडेनंतर आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई कोरोना पाॅझिटिव्ह”