आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं.
दादांचं काम, दादांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजकीय विचार आमचे विरोधात असतील पण मामा, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादांचा फॅन आहे. मला सांगायला काही अडचण वाटत नाही, आमचं राजकीय जमतं का तर जमतंच नाही. पण दादांची शिस्त, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टवक्तेपणा… दादांचं दादांकडेच आहे दुसऱ्या कुणाकडे नाही, असं जयकुमार गोरे म्हटलं आहे.
हे ही वाचा : ‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका
दरम्यान, जयकुमार गोरे यांनी अजितदादांचं कौतुक केल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय. तुम्ही ज्याप्रमाणे आज दादांचं कौतुक केलं. भाऊ तुमच्याही कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे. तुम्हीपण हाडाचा कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करता. पण भाऊ ठिक आहे. होतात… चुकतो तोच माणूस असतो. आज आमच्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही एवढा चांगला केलाय. असाच चांगला विचार भविष्यात करा, असं दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चांदगाव येथील अनेक युवकांचा मनसेत प्रवेश”
“ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह; लग्नसोहळ्यानंतर 4 दिवसात पाॅझिटिव्ह”